चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

✨ आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राऊत यांनी एक्स (माजी ट्विटर) वर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत दावा केला की, ‌‘शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पक्ष सोडून गेले. यासोबतच त्यांनी गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

या प्रकरणात चार मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ आयएसआय, आयपीएस अधिकारी, माजी व विद्यमान मंत्री आणि राजकीय नेते अडकले असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिक येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रॅकेट उघड झाल्याचा आरोप आहे. ठाणे क्राईम ब्रँचकडे तक्रारी दाखल झाल्या असून गोपनीय तपास सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याच प्रकरणात विधानसभेत 72 हून अधिक अधिकारी व माजी मंत्र्यांचा समावेश असलेला पेन ड्राईव्ह दाखवला होता.

Sanjay Raut Post War

विधानसभेत राज्यात हनी ट्रॅप

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनीही प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजन यांचा वर विश्वासू कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात हनी ट्रॅप नाही असे स्पष्ट केले असले तरी, राऊत यांनी मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत असा आरोप करत, सीबीआय मार्फत चौकशी करून दूध का दूध, पानी का पानी करावे, असे आवाहन केले आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी महायुती सरकार, विशेषतः भाजप व शिंदे गटावर ताण वाढला आहे. सध्या या प्रकरणावर राजकीय वतुर्ळात चर्चेची तीव्रता वाढली असून, शासनाकडून कोणती अधिकृत कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Politician on x

Dhruv

लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि सहज समजेल अशा शैलीत वाचकांसमोर कथा, लेख किंवा माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. वाचन, संशोधन आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड यामुळे लेखन प्रवास अधिक समृद्ध होत आहे. माझ्या लिखाणातून वाचकांना केवळ माहितीच नाही, तर प्रेरणा, आनंद आणि विचारांची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.

1 Comments

  1. दररोज सकळी १० वाजता उपडेट मिळत राहतील. (LIVE)

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form