गुड न्यूज! आयफोनच्या किंमतीत झाली घट, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही

🔔 सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मोबाईल फोन आणि चार्जर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अॅपल कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीमाशुल्कात 20 टक्क्यांवरून 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रो आणि प्रो मॅक्स यासारख्या महागड्या फोनच्या किंमती 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. मेड इन इंडिया आयफोन 13, 14 आणि 15 च्या दरातही 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. आयफोन एसईच्या किंमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. अॅपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या काही मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत, याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे.

iPhone Prise down

आयफोनचे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • ✓ आयफोन एसई (iPhone SE) – 47,600 रुपये
  • ✓ आयफोन 13 (iPhone 13) – 59,600 रुपये
  • ✓ आयफोन 14 (iPhone 14) – 69,600 रुपये
  • ✓ आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) – 79,600 रुपये
  • ✓ आयफोन 15 (iPhone 15) – 79,600 रुपये
  • ✓ आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) – 89,600 रुपये
  • ✓ आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) – 1,29,800 रुपये
  • ✓ आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) – 1,54,000 रुपये

Dhruv

लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि सहज समजेल अशा शैलीत वाचकांसमोर कथा, लेख किंवा माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. वाचन, संशोधन आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड यामुळे लेखन प्रवास अधिक समृद्ध होत आहे. माझ्या लिखाणातून वाचकांना केवळ माहितीच नाही, तर प्रेरणा, आनंद आणि विचारांची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form